Mahamritunjay-jaap-Pooja-Trimbakeshwar-Marathi
महामृत्युंजय मंत्र :
‘‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||’’
महादेवाचा महामंत्र, त्यांना प्रसन्न करणारा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र. महामृत्युंजय मंत्र जाप करणे इतके शक्तिशाली असते कि त्याचा ध्वनी लहरींचा कंपनातून व्यक्तीचा शरीराभोवती एक शक्तिशाली कवच तयार होते. महामृत्युंजय मंत्र जाप मुळे तयार झालेले शक्तिशाली कवच त्या व्यक्तीचे सर्व वाईट शक्तींपासून सौरक्षण करते. या दिव्य कवच मध्ये ३३ कोटी देवतांचा वास असतो जे महामृत्युंजय मंत्रातील ३३ अक्षरांनी दर्शवले जातात. महामृत्युंजय मंत्र जपामुळे अकाली मृत्यू टाळला जातो. व्यक्ती निर्भय बनतो, सकारात्मक बनतो, सर्व आजार त्याचा पासून दूर पाळतात, माणसाचे आयुष्य आनंदी आणि शांतीचे बनते.
महामृत्युंजय मंत्र हा महादेवाचा सर्वात आवडता आणि शक्तिशाली मंत्र आहे. १०८ रुद्राक्ष असलेल्या माळेचा वापर करून महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि माणसाची मनोकामना पूर्ण करतात.
१०८ वेळा महामृत्युंजय मंत्र जाप :
'१', '०' आणि '८" हे एकाच वेळी विश्वाचे खरे सत्य दर्शवण्याचे काम करतात एक, शून्य आणि अनंत. सूर्य आणि पृथ्वी मधील अंतर हे सूर्याचा व्यासाचा १०८ पट अधिक आहे. तसेच पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर चंद्राचा व्यासापेक्षा १०८ पट अधिक आहे. हिंदू धर्मात सर्व शक्तिशाली मंत्र जाप चा प्रभाव दिसण्यासाठी त्याचा १०८ वेळा जाप करणे महत्वाचे असते.
महामृत्युंजय मंत्र जाप करताना चे काही नियम :
१) महामृत्युंजय मंत्र हा महादेवाचा सर्वात आवडता, शक्तिशाली आणि पवित्र मंत्र आहे त्यामुळे मंत्र जाप करताना नेहमी मन आणि डोके साफ ठेवावे.
२) मंत्र जाप करताना शिवलिंग समोर बसून मंत्र जाप करणे जधीही उत्तम.
३) पूर्व दिशेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र जाप करावा.
४) मंत्र जापाचे उत्तम परिणाम भेटण्यासाठी महामृत्युंजय मंत्रातील प्रत्येक शब्दाचा योग्य ऊच्चार करावा.
५) तोंडातून आवाज न काढता फक्त ओठांची हालचाल करूनच मंत्र जाप करावा.
६) महामृत्युंजय मंत्र जाप करणाऱ्या व्यक्तीने मांस, दारू, सिगरेट इत्यादी व्यसन पासून दूर राहावे.
७) १०८ रुद्राक्ष माळेचा वापर करून मंत्र जाप करावा.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी केला जाणारा महामृत्युंजय मंत्र जाप :
महामृत्युंजय मंत्र जाप करताना काही विशिष्ट अशा योगिक क्रियांचे पालन करावे लागते. त्यामुळे योग्य गुरूंचा मार्गदर्शनाखालीच महामृत्युंजय मंत्र जाप करण्याचे सांगितले जाते. त्र्यंबकेश्वर येथे ताम्रपत्रधारी पंडितांचा हातून केला जाणारा महामृत्युंजय मंत्र जाप हा खूप फलदायक ठरतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे असेच एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तींना दर्शवते. तिन्ही शक्तींचा वास असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे कोणतीही पूजा, विधी केल्याने ती सफल होते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे.
त्र्यंबकेश्वर चे ताम्रपत्रधारी पंडित हे सर्वात ज्ञानी पंडित मानले जातात. ज्यांना पूजेचे अस्सल महत्व माहित आहे. ताम्रपत्रधारी पंडितांना पिढ्यांपासून पूजा करण्याचे अनुभव आहे. योग्य मंत्र कोणते, पूजा करण्याची योग्य पद्धत, प्रत्येक मंत्राचा अर्थ या पंडितांना माहित आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये फक्त ताम्रपत्रधारी पंडितांना पूजा करण्याचा अधिकार आहे. ताम्रपत्रधारी पंडित काल सर्प दोष पूजा, नारायण नागबली पूजा, त्रिपिंडी श्राद्ध पूजा , कुंभ विवाह, महामृत्युंजय मंत्र जाप पूजा, रुद्राभिषेक पूजा इत्यादी सर्व प्रकारचा पूजा करण्यासाठी तुमची मदत करतील.
महामृत्युंजय मंत्राचे फायदे पुरश्चरण पद्धतीद्वारे होतात जे पाच प्रकारचे असतात :
१) जप (जाप)
२) हवन (हवन)
३) तर्पण (तर्पण)
४) मर्जयामी (मार्जयामि)
५) ब्राह्मणाला अन्न अर्पण करणे (ब्राह्मण भोजन)
शास्त्रात असे सांगितले आहे कि महामृत्युंजय मंत्राचा सव्वा लाख वेळा जप केल्यास हा मंत्र जागृत होतो आणि आणखी लाभदायक ठरतो.
महामृत्युंजय मंत्रजाप करण्याचा उत्तम कालावधी हा सकाळचा असतो. दुपारी १२ वाजल्यानंतर महामृत्युंजय मंत्र जाप करू नये. त्र्यंबकेश्वर सारख्या जागृत ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महामृत्युंजय मंत्र जाप करताना त्र्यंबकेश्वर चा अधिकृत ताम्रपत्रधारी पंडितांकडून मुहूर्त काडून घ्यावा.
त्र्यंबकेश्वर मंदिर चा ऑफिसिअल वेबसाइट वरून तुम्ही ताम्रपत्रधारी पंडितांशी संपर्क साधून ऑनलाईन पूजा बुकिंग करू शकता.
Comments
Post a Comment