Trimbakeshwar Rudrabhishek Pooja | Marathi
रुद्राभिषेक विधी महादेवाला समर्पित असणाऱ्या विशेष विधी पैकी एक आहे. हा विधी लोक महादेवापुढे आपल्या इच्छा व्यक्त करण्या साठी आणि त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना करण्या साठी करतात. या विधीत महादेवाला मंत्र उचारांसह पंचामृताने अभिषेक घातला जातो. रुद्राभिषेक विधी मुले माणसाचा आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते, सुख संपत्ती लाभते, तसेच माणसाने केलेल्या पापांपासून त्याची मुक्तता होते. रुद्राभिषेक करतानाच मंत्रांमुळे सभोवतालचे वातावरण सकारात्मकतेने भरून जाते. माणसांचा मनात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विधी वेळी महादेवाचे शिवलिंग बेलाची पाने, फुले, रुद्राक्ष, याने सजवून महादेवाचा १०८ नावांचा जप केला जातो.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे पूजा करण्या बाबतचे विशेष महत्व आहे. त्र्यंबकेश्वर येथे काल सर्प दोष, नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्राभिषेक, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप इत्यादी अनेक प्रकारचा पूजा केल्या जातात. महादेवाची रुद्राभिषेक पूजा भक्तांना सुख, शांती, समाप्ती, आरोग्यदाई जीवन प्राप्त करून देणारी आवश्यक आणि अध्यात्मक क्रियांपैकी एक आहे. रामाने देखील सीतेला रावणाचा तावडीतून सोडवण्याचा प्रवास चालू करण्यापूर्वी रुद्राभिषेक पूजा केली होती. त्र्यंबकेश्वर मध्ये रुद्राभिषेक पूजा स्वतः प्रकट झालेल्या ज्योतिर्लिंगावर केली जाते त्यामुळे येथे केल्या जाणाऱ्या पूजेला विशेष महत्व आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी तुम्हाला पूजेची प्रिबुकिंग करणे महत्वाचे आहे. https://www.trimbakeshwar.org/ या वेबसाईट वरून तुम्ही पूजा बुक करू शकता. त्र्यंबकेश्वर मध्ये फक्त ताम्रपत्रधारी पंडितच पूजा करू शकतात. ताम्रपत्रधारी पंडित हे त्र्यंबकेश्वर मधील अस्सल पंडित आहे आणि फक्त त्यांनाच तेथे पूजा करण्याचा अधिकार आहे.
त्र्यंबकेश्वर मध्ये महाशिवरात्रीचा दिवशी मोठ्या संख्येने लोक रुद्राभिषेक करण्यासाठी येतात. रुद्र अवतार आहे महादेवाचा सर्व अवतारांपकी एक आहे जो अतिशय उग्र आणि आक्रमक आहे. रुद्र म्हणजे सूर्य आणि चंद्राचे डोळे, वाऱ्याचा श्वास, वेदांचा आवाज आणि विश्वाचे हृदय. हे सर्व जग रुद्रा चा पायापासून उद्भवले आहे.
रुद्राभिषेक पूजत महादेवाला अर्पण करण्यात येणारी विविध पदार्थ :
स्नान आणि फुले , दूध, मध, पाणी, चारनामृत, तूप, साखर, फुले, बेल पत्र, गंगाजल
त्र्यंबकेश्वर ताम्रपत्रधारी पंडित :
त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा करण्यासाठी गेल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे . तुम्ही ज्या पंडितांकडून पूजा करून घेत आहे ते ताम्रपत्रधारी पंडित आहे कि नाही याची खात्री करून घ्या. कारण फक्त ताम्रपत्रधारी पंडित च तेथील अस्सल पंडित आहे. ताम्रपत्रधारी पंडितांना प्रत्येक पूजेचा अनेक वर्षांचा अनुभव आहे . ताम्रपत्रधारी पंडितांना त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा करण्याचा जन्मतः अधिकार आहे. तुमची पूजा सफल होण्यासाठी तुम्ही प्रामाणिक पंडितां कडूनच पूजा करावी अशी आमची इच्छा आहे.
महाशिवरात्री चा दिवशी रुद्राभिषेक पूजा करण्याचे फायदे :
हिंदू धर्मात महाशिवरात्री या सणाला फार महत्व आहे. महाशिवरात्रीचा दिवस महादेवाला समर्पित केला जातो. या दिवशी त्र्यंबकेश्वर मध्ये मोठी यात्रा भरते, लोक रात्र भर जागरण करतात आणि महादेवाची उपासना करतात. महाशिवरात्री चा दिवशी शिव तत्व प्रकट होते आणि आपल्याला आशीर्वाद देते . त्यामुळे या दिवशी रुद्राभिषेक, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप या सारखे विधी करून आपण शिव ऊर्जेची झलक आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो.
ज्याव्यक्तीला आपल्या कुटुंबात सुख, शांतीची, समाधान हवे असेल अशा व्यक्तीने रुद्राभिषेक पूजा नक्की करावी. तसेच अस्जराने जडलेला व्यक्ती, यश मिळवण्यासाठी हि रुद्राभिषेक पूजा फायदेशीर ठरते. रुद्राभिषेक पूजे मुले राहू, केतू सारख्या नकारात्मक ग्रहांचे घटक परिणाम आयुष्यातून नाहीशे होतात. रुद्राभिषेक पूजेमुळे शनी चा प्रभाव हि कमी होतो.
रुद्र मंत्र :
ओम नमो भगवते रुद्रय । (ॐ नमः भगवतेः रुद्राय)
पंचाक्षरी मंत्र :
ओम नमः शिवाय (ॐ नमः शिवाय)
त्र्यंबकेश्वर मध्ये रुद्राभिषेक पूजेसाठी होणारा खर्च :
त्र्यंबकेश्वर मध्ये ताम्रपत्रधारी पुरोहितांच्या हातून हा विधी केला जातो. कारण हे पुरोहित तेथील अस्सल पंडित आहेत आणि त्यांच्याकडे पेशवा बाजीराव यांनी दिलेले ताम्रपत्रे आहेत. पूजे मध्ये सहभागी असलेले पंडित , पूजा सामग्री आणि पूजे साठी लागणार कालावधी यावर पूजेचा खर्च ठरवलं जातो. पूजे ला येण्या पूर्वी पूजेची बुकिंग करणे आवश्यक आहे.
त्र्यंबकेश्वर मध्ये केल्या जाणाऱ्या सर्व पूजा :
काल सर्प दोष, नारायण नागबली पूजा, त्रिपिंडी श्राद्ध पूजा, रुद्राभिषेक पूजा, कुंभ विवाह, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप या त्र्यंबक मध्ये केल्या जाणाऱ्या महत्वाचा पूजा आहेत.
या व्यतिरिक त्र्यंबकेश्वर मध्ये केल्या जाणाऱ्या पूजा : १) लागू, महा, अति, जल रुद्राभिषेक पूजा २) महाशिवरात्र पूजन ३) रुद्र चमकाम यज्ञ ४) एकवस्त्रीसनं ५) विष्णुबली ६) सोळा सोमवार पूजा ७) नक्षत्र शांती पूजा ८) नवग्रह शांती पूजा ९) योग्य शांती पूजा १०) कारण शांती पूजा इत्यादी
Laghu Rudra Abhishek,
Comments
Post a Comment